Jejuri Khandoba Mandir : जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा दीड महिन्यांनी दर्शनासाठी खुला; गडावर भाविकांची अलोट गर्दी

Jejuri Khandoba Mandir : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. खंडोबा गडावर दुरूस्तीच्या कामामुळे मुख्य गाभाऱ्याचे दर्शन गेल्या दीड महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले होते. हे मंदिर दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने शनिवारपासून (२१, ऑक्टोंबर) मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा गेल्या दीड महिन्यांपासून बंद होता. दुरूस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदीर प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

Ajit Pawar News : कंत्राटी भरतीचा निर्णय योग्यच होता, पण... अजित पवारांकडून समर्थन, विरोधकांवर टीका

खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू होती. त्यामुळे भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आले होते. हे दुरूस्तीचे काम पुर्ण झाल्याने आता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

दीड महिन्यांपासून मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद असल्याने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर घटली होती. आता पुन्हा मंदिर सुरू होत असल्याने दसऱ्यानंतर भाविकभक्तांची गर्दी पुन्हा वाढणार आहे. मंदिर प्रशासनाकडून दसऱ्याचीही जय्यत तयारी करण्यात आली असून आकर्षक रोषणाईच्या झगमगाटाने मंदिर उजाळून निघाले आहे.

एकविरा देवीचे मंदिर चोवीस पुढील २ दिवस २४ तास खुले राहणार....

आई एकविरा देवीच्या भाविकांसाठीही एक आनंदाची बातमी. महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचे मंदिर आजपासून सप्तमीच्या महानवमीपर्यंत चोवीस तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. याबाबतची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply