Jayant Patil : शरद पवार जाण्यासाठी कधीच तयार नव्हते; पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

 

Jayant Patil : शरद पवार यांनी त्यांची विचारसरणी स्वीकारण्यास नकार दिला, त्यामुळे पक्ष फुटला. मात्र काहीही किंमत झाली तरी विचारसरणी बदलायची नाही या भूमिकेवर शरद पवार ठाम होते, अशा शब्दांत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना उत्तर दिलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील पुढे म्हणाले की, शरद पवारांना NDA मध्ये नेण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते. यावर शरद पवार तयार असते तर गेलेच असते ना? शरद पवार जाण्यासाठी कधीच तयार नव्हते, असं ही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

RBI Action News : आरबीआयची मोठी कारवाई! शिरपूर मर्चंट बँकेच्या व्यवहारांवर ६ महिने बंदी

राज्यात लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू आहे. या रणधुमाळीत काल प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार देखील भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते’, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. पटेल यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

त्यावर आता जयंत पाटलांनी थेट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचाच विजय होणार असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्यांना नकली म्हणायचं. ज्यांनी फोडाफोड केली त्यांनीच कोण असली आणि कोण नकली हे सांगायचं, त्यापेक्षा भारतीय जनतेला ठरवू द्या कोण असली आणि कोण नकली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply