Jayant Patil : जयंत पाटीलांच्या अडचणी वाढणार? राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह 14 ठिकाणी EDचे छापे

Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीने छापेमारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसात ठाकरे गटाच्या नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी झाली तर आता राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 14 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित ही बँक आहे. 10 वर्षांपूर्वीच्या 1000 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडी करत आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठी रक्कम रोकड स्वरुपात वळव्याचा आरोप करण्यात आला आहे. हे व्यवहार बँकेने लपवून ठेवल्याचाही आरोप आहे. या कथित घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सामील असल्याचा संशय ईडीला आहे.

सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या सुरेश आणि दिनेश पारेख बंधू, अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापाऱ्यांसह पिंटू बियाणी या व्यापाऱ्यावर काल ईडीच्या पथकांनी छापे टाकून तपासणी केली आहे.

आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ११ वाहनांमधून ६० अधिकारी या कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले होते. तर या पथकासोबत आलेल्या सीआरपीएफच्या जवानांचा बंगल्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

दरम्यान या छापेमारीवेळी गुप्तता पाळण्यात आली होती. शहरातील शासकीय रुग्णालयामागे त्रिकोणी बागेसमोर दिनेश पारेख आणि सुरेश पारेख या व्यापारी भावांचे शेजारी-शेजारी बंगले आहेत. दोघेही इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे व्यापारी आहेत. दोघांच्या घरांवर काल (२३ जून) सकाळी ७ वाजता ईडीने छापा टाकला. त्यानंतर काही वेळात न्यू प्राइड मल्टिप्लेक्स शेजारच्या व्यंकटेशनगरातील अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या इलेक्ट्रिक साहित्याच्या व्यापाऱ्यांच्या घरांवरही ईडीच्या पथकांचे छापे टाकले. यासोबतच पिंटू बियाणी या व्यापाऱ्यांच्या घरावरही ईडीच्या पथकांचे छापे टाकले.

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *