Jayakwadi Dam Lavel : नाशिकच्या दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; जायकवाडीचा पाणीसाठा झपाट्याने वाढला

Jayakwadi Dam Lavel : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जोर पकडलाय. मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढत होतेय. अशातच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.

त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam Water Level) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या दारणा धरणातून ६,७३८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे दारणा नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Alert : पुण्यासह 'या' जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट; अतिमुसळधार पाऊस कोसळणार

गेल्या ८ दिवसांपासून दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ६६ टक्के भरलं आहे. त्यामुळे गोदावरी नदीत (Godavari River) पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी झेपावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा १२ टक्क्यांवर पोहचला आहे.

मागील आठवडाभरापासून मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये तब्बल ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर जालना, बीड, तसेच परभणी शहराला पाणीपुरवठा केला जातो.

गेल्यावर्षी धरणसाखळी क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा जायकवाडी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्यास्थितीला जायकवाडी धरणात केवळ १२ टक्के इतका पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे भरपावसाळ्यात छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. अशातच नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढल्यास जायकवाडीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होईल, त्यामुळे मराठवाड्यावर पाणीटंचाईचं संकट दूर होईल.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply