Jayakwadi Dam : मराठवाड्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरूवात

Jayakwadi Dam : नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये पहिला विसर्ग १०० क्युसेक्सने करण्यात आला असून रात्री ११ वाजता पाणी सोडण्यात आले. मराठवाड्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडायला सुरुवात झाली. पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर २५ दिवस उशिराने का होईना नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Jalna Antarwali Sarati News : अंतरवाली दगडफेक प्रकरणी मोठी कारवाई; प्रमुख आरोपी अटकेत

पहिल्या टप्प्यात शुक्रवारी रात्री १० वाजेनंतर नाशिकच्या दारणा धरणातून १०० क्यूसेकने विसर्ग सुरू झाला. नंतर त्यात गरजेनुसार वाढ करण्यात येणार आहे. पाठोपाठ नगरच्या धरणातूनही विसर्ग केला जाईल. दरम्यान, हे पाणी जायकवाडी धरणात येईपर्यंत ४८ तास लागतील. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी येणे अपेक्षित होते.

प्रत्यक्षात गोदावरी महामंडळ प्रशासनाने पाणी  सोडण्याबाबतचे आदेश १५ दिवस उशिरा काढले. या आदेशाला नगर, नाशिकच्या पुढाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल. मात्र, तिथे स्थगिती मिळाली नाही. पण तरीही पाणी सोडले नव्हते. त्यामुळे मराठवाड्यात जनआंदोलन तीव्र झाले. त्याची २५ दिवसांनं शासनाने दखल घेतली. २४ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर, जालना, गेवराई, माजलगाव आणि परभणीला फायदा होणाऱ्या जायकवाडीत सध्या ३९ टक्केच पाणी आहे. ऊर्ध्व खोऱ्यांतील धरणाच्या पाण्यामुळे कृषी, उद्योगाची गरज आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होऊ शकेल. त्याचबरोबर रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, फळपिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडणे शक्य होईल.

पाणी कुठून सोडले जाणार ?

ऊर्ध्व खोऱ्यातील २३ धरणांचे पाच समूह यामध्ये नगर, नाशिकच्या मुळा, मुठा, प्रवरा, गोदावरी-गंगापूर, दारणा , पालखेडचा समावेश होतो. यातून जेथे मुबलक उपलब्धता आहे तेथून जायकवाडीत पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार.

दोन टीएमसी पाणी होणार गायब

पाणी सोडण्यास २५ दिवस उशिर झाला आहे. त्यामुळे आत ८.६ टीएमसीऐवजी जायकवाडीत प्रत्यक्ष ६.६ टीएमसीच पाणी येईल. उर्वरित दोन टीएमसी पाणी कालव्यात, पात्रात जिरेल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply