Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी द्या अन्यथा पश्चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस रोखणार

Jayakwadi Dam : जायकवाडीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला मराठवाड्यातील साखर कारखान्याच्या अध्यक्ष आव्हान देण्याची तयारीत आहेत.

जायकवाडीचा पाणीप्रश्न आता चांगलाच पेटलाय. जलसंपदा विभागाने 8.5 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश देऊनही पाणी सोडलं जात नाही. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Aditya Thackeray : तर माझ्या आजोबांना आनंद झाला असता"; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर २१ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काचं साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात यावं यासाठी जालन्यातील समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे पाटील हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत.

मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जायकवाडीत न सोडल्यास पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मराठवाड्यातून जाणारा साडेबारा हजार मेट्रिक टन ऊस रोखणार असल्याचं सांगत मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी जाणारे परत बोलावणार असल्याचा इशारा घाटगे यांनी दिला.

त्यामुळे आत्ता पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला देणार मराठवाड्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष आव्हान देणार असल्याने नवा संघर्ष बघायला मिळणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply