Japan Earthquake : नवीन वर्षाची भयंकर सुरुवात, जपानमध्ये ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा

Japan Earthquake : जपानमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय. हा भूकंप तब्बल ७.४ रिश्टर स्केलचा आहे. सोमवारी इशिकावा येथे जमिनीला मोठे हादरे बसले. भूकंपाची तीव्रता पाहून त्सुनामीचाही इशाराही देण्यात आलाय. भूकंपाचे जोरदार हादरे बसल्यानंतर नागरिकांची मोठी पळापळ झाली.

जपानच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इशिकावाच्या नोटो द्वीपकल्पावर 1.2 मीटर उंचीपर्यंतच्या लाटा आदळल्या आहेत. त्यामुळे इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चरच्या किनारी भागासाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

Political News : दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागतोय; सुप्रिया ताई 15 वर्ष दादांमुळे निवडून आल्या; रुपाली चाकणकर कडाडल्या

जपानमध्ये नेहमीच भूकंपाच्या घटना घडत असतात. कारण जपान रिंग ऑफ फायर क्षेत्रात येतं. रिंग ऑफ फायर असं क्षेत्र आहे ज्यात कॉन्टिनेंटल प्लेट्ससह ओशियनिक टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. हे क्षेत्र ४० हजार किलोमिटरमध्ये पसरलंय.

जापान, रूस, फिलिपींस, इंडोनेशिया, न्यूजीलँड, अंटार्कटिका, कनाडा, अमेरिका, मैक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टा रिका, पेरू, इक्वाडोर, चिली, बोलिविया हे देश रिंग ऑफ फायरमध्ये येतात.

जपानमध्ये गेल्यावर्षी ५ ऑक्टोबर रोजी देखील भूकंपाते तीव्र झटके जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 6.6 रिक्टर स्केल इतकी मोजण्यात आली. साल 2011 मध्ये झालेल्या प्रचंड भूकंपामुळे त्सुनामीने उत्तर जपानचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला होता. यात फुकुशिमा अणू प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply