Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला आग; चार जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना समोर आली असून पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली. या अपघातात 4 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. अद्याप लष्काराकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच लष्कराचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये लष्कराच्या वाहनाला आग लागल्याचे दिसत आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलिस आणि लष्करालाही माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. वाहनाला आग कशी लागली याचा तपास सध्या सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *