Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला; आतापर्यंत ५ जवान शहीद

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सोमवारी (ता. ८) दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) लष्कराचे ५ जवान शहीद झाले आहेत. तर ५ जवान जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कठुआ शहरापासून १५० किमी अंतरावर असलेल्या लोहाई मल्हार येथील बदनोटा गावाजवळ भारतीय लष्कराचे वाहन नियमित गस्त घालत होते. या वाहनात जवळपास १० जवान होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला अचानक ग्रेनेड हल्ला केला.

Mumbai Rain : ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

यावेळी अंदाधुंद गोळीबार देखील केला. या हल्ल्यामध्ये एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद झाले. तर पाच जवान गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. हल्लेखोरांना निष्प्रभ करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तातडीने या भागात रवाना करण्यात आले.

लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या ३ होती. या दहशतवाद्यांनी अलीकडेच सीमेपलीकडून घुसखोरी केल्याचे समजते. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी कठुआ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

त्यांनी सोशल मीडिया एक्स हँडलवर लिहिले की, “कठुआ चकमकीत शहीद झालेल्या शूर जवानांप्रती मी शोक व्यक्त करतो. मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. पोलिस आणि निमलष्करी दलाची संयुक्त कारवाई सुरू आहे. आम्हाला आमच्या सशस्त्र दलांवर पूर्ण विश्वास आहे. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जाईल”



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply