Lok Sabha Election : जम्मूमध्ये प्रचाराला वेग

Jammu : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उधमपूर येथे शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष जम्मू मतदारसंघाकडे लागले आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येथे २६ तारखेला मतदान होणार आहे. खोऱ्यात विशेष अस्तित्व नसलेल्या भाजपने जम्मूमध्ये मात्र जुगलकिशोर शर्मा यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले असून त्यांचा सामना ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार रामबन भल्ला यांच्याशी होणार आहे.

जम्मू लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जम्मू, सांबा, रियासी जिल्ह्यांसह राजौरी जिल्ह्याचा काही भाग येतो. जुगलकिशोर शर्मा आणि भल्ला यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात आहेत. यात बहुजन समाज पक्षाचे जगदीश राज आणि सनातन भारत दलाचे अंकुर शर्मा यांचा समावेश आहे. राजकीय पक्षांनीही जम्मूमधील प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे.

IPL 2024 : सामना हरल्यानंतर RCB अन् पंजाबच्या कर्णधारांवर कडक कारवाई! BCCI ने ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंड

अनेक स्थानिक नेते जम्मूमध्येच ठाण मांडून बसले असून कार्यकर्ते घरोघरी जात प्रचार करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची १६ एप्रिलला येथे सभा झाली होती, तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही मागील महिन्यात येथे रोड शो केला होता. जुगलकिशोर शर्मा हे २०१४ आणि २०१९ ची निवडणूक जिंकली होती.

मागील निवडणुकीत त्यांनी भल्ला यांचाच पराभव केला होता. त्यामुळे यंदाही त्याच विजयाची पुनरावृत्ती करत हॅट्‌ट्रिक साधण्याची त्यांना अपेक्षा आहे.मोदींची विकास कामे, कलम ३७०, दहशतवादावर वचक हे भाजपच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत. तर भल्ला यांना यंदा नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे पाठबळ आहे. त्यामुळे यंदा आपल्याला नक्की विजय मिळेल, असा भल्ला यांना विश्‍वास आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply