Jalna OBC Sabha : 'ते 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?', अंतरवलीतील लाठीचार्जवर काय म्हणाले छगन भुजबळ?

Jalna OBC Sabha : जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाजाची सभा होत आहे. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांकडून अंबडमध्ये आरक्षण बचाव एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या आयोजित परिषदेला मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबासीमधून आरक्षण देण्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'उपोषण केलं. काय झालं पोलिसांचा लाठीचार्ज झाला. पोलिसांचा लाठीचार्ज सर्वांनी पाहिला. महिला पोलिसांसह ७० पोलिस रूग्णालयात अॅडमिट झाले. दगडांचा मार खाऊन जखमी झाले. पोलीस त्यांना उठवायला गेले तेव्हा ते म्हणाले, मी झोपलोय नंतर या ते पुन्हा येईपर्यंत त्यांनी सर्व तयारी करून ठेवली. तिथे महिला देखील होत्या त्यामुळे महिला पोलीस देखील तिथे आल्या होत्या.'

Chhagan Bhujbal : तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही; ओबीसी सभेतून भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

'पोलिसांनी जशी विनंती केली चला, तुमची तब्येत खूप वाईट आहे. आता रूग्णालयात गेलं पाहिजे. त्याचवेळी दगडाचा मारा सुरू झाला, पोलीस पटापट जमिनीवर पडले. ७० पोलीस काय पाय घसरून पडले का? कोणी मारलं त्यांना रूग्णालयात रेकॉर्ड आहे. इतकंच नाही, तर या राज्यात महिला आयोगाच्या चाकणकर असतील आणखी कोण असेल. त्यांना इकडे यावं आम्ही त्या महिला पोलिसांच्या घरते पत्ते तुम्हाला देतो. त्यांची काय परिस्थिती झाली ती त्यांना विचारा, त्या सांगतील तुम्हाला, असंही भुजबळ पुढे म्हणालेत.

'छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सूनांना देखील आई म्हणून परत पाठवलं आणि तुम्ही आमच्या पोलिसांच्या अंगावर गेलात. लाज कशी नाही वाटली तुम्हाला. हे सर्व झाल्यानंतर म्हणाले की, पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची बाजू आलीच नाही, एकच आले पोलिसांनी हल्ला केला' असंही पुढे भुजबळ म्हणाले.

'उपोषण केले, पोलिसांचा लाठीचार्ज झाला. तो लाठीचार्ज सगळयांनी पहिला. फक्त 70 पोलीस कर्मचारी होते तिथे तेव्हा दगडाचा मारा सुरु झाला. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सुनेला परत पाठवले पण यांनी काय केले तर महिला पोलिसांवर दगडफेक केली.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply