Jalna OBC Andolan : जालन्यात ओबीसी समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला; भरस्त्यात टायरं जाळली

Jalna OBC Andolan : सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला उगाच धक्का लागू नये, अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी जालन्यातील वडीगोद्री गावात उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. हाके यांच्या उपोषणाला ओबीसी बांधवांनी मोठा पाठिंबा दिला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत.

आताच हाती आलेल्या माहितीनुसार, ओबीसी बांधवांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला आहे. जालना जिल्ह्यातील जामखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे.

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार? शरद पवार म्हणाले, ...ते मी बघून घेतो!

काहींनी भररस्त्यात टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे. ओबीसी आंदोलकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना महामार्गावरून बाजूला केलंय.

सध्या परिसरात तणापूर्ण शांतता आहे. कुणीही कायदा हातात घेऊन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी देखील मोठा प्रतिसाद दिला आहे.

केज तालुक्यातून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी तब्बल २०० गाड्यांचा ताफा रवाना झाला आहे. मागील ७ दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी जालन्याकडे कूच केली आहे.

राज्य सरकारने कोणत्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी, त्याबरोबरच लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी. अशी आग्रही भूमिका ओबीसी समाज बांधवांनी घेतली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड हे आज हाके यांची भेट घेणार आहेत. प्रकाश आंबेडकर देखील त्यांच्या भेटीला जाणा असल्याची माहिती आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply