Jalna News: मराठा आरक्षण आंदोलन पेटलं; जालन्यात आंदोलकांनी बस पेटवली

जालन्यातील शहागड येथे पोलिसांनी मराठा आंदोलन चिघळल्याची माहिती समोर आली आहे . पोलिसांनी आंदोलकांवर मारहाण केल्यानंतर जालन्यातील अंतरवालीमध्ये आंदोलकांनी बस पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याचीही माहिती आहे.

जालन्यातील शहागड येथे मराठा आंदोलकांचं उपोषण सुरू होतं. यानंतर आज शहागड येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आंदोलकांनी पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून जालन्यात आमरण उपोषण सुरू होतं.

जालना: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार

नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू होतं. आज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळली. त्यानंतर आज जरांगे पाटील हे उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. त्याचवेळी आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली.

पोलिसांवर दगडफेक झाल्यावर त्यांनी प्रत्युत्तरात लाठीमार व अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या, अशी प्राथमिक माहिती आहे. तसेच याच आंदोलकांनी बस देखील पेटवल्याची माहिती आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply