Jalna News : संभाजी भिडेंच्या प्रतिमेची अंत्ययात्रा; शाब्दिक चकमकीनंतर पोलिसांचा समता परिषदेच्या आंदोलकांवर लाठीचार्ज

जालना : महात्मा फुले यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा अखिल भारतीय समता परिषदेच्यावतीने जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले. समता परिषदेच्यावतीने संभाजी भिडे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनादरम्यान पोलीस व आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली.  

जालना शहरातील लहुजी साळवे चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांनी महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. संभाजी भिडे यांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा काढत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलना दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. 

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले; विधानसभा अध्यक्षांनीच काढलं स्टिकर, व्यासपीठावर नेमकं काय झालं?

दोन आंदोलक ताब्यात 

सादर आंदोलनादरम्यान पोलिसांनी २आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान भिडे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आंदोलकांनी केली. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी नाहक लाठीचार्ज केला; असा आरोप समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply