Jalna Antarwali Sarati News : अंतरवाली दगडफेक प्रकरणी मोठी कारवाई; प्रमुख आरोपी अटकेत

Jalna Antarwali Sarati News : अंतरवाली दगडफेक प्रकरणी मोठी कारवाई; प्रमुख आरोपी अटकेतजालन्यातील अंतरवाली दगडफेक प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज झाल्यानंतर हिंसा आणि जाळपोळ प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाल्यानंतर हिंसा आणि जाळपोळ प्रकरणी अंबड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंबड पोलिसांनी ४ जणांना बीड जिल्ह्यातील गेवराईमधून ४ जणांना ताब्यात घेतलं.

Maratha Reservation : 'हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या हालचाली?', जरांगे पाटील म्हणाले...

प्रमुख आरोपी सराईत गुन्हेगार

पोलिसांनी ऋषीकेश बेद्रे (43),निलेश राठोड,(42) ,शनिदेव शिरसठ( 22) कैलास सुरवसे (41 ) यांना ताब्यात घेतलं आहे. अंतरवाली सराटी येथील जाळपोळ प्रकरणात ताब्यात असलेल्या चारही जणांचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेद्रे यांच्याकडे गावठी पिस्तूलासह 2 जिवंत काडतुसे सापडली आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले चारही जण सराईत गुन्हेगार असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर यापूर्वी ही गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

बीडमध्ये ४ आरोपींना घेतलं ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील आरोपी बीड जिल्ह्यात काळ्या रंगाच्या चारचाकीतून फिरताना आढळले. त्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई येथून पोलिसांनी या चारही जणांना ताब्यात घेतले.

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना त्यांच्याजवळ एक पिस्तूल (गावठी कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसे सापडले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply