Jalna Accident : जालन्यात विहिरीत कोसळली जीप, 7 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

Jalna Accident : जालन्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे टॅक्सी जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जण 6 जन जखमी झालेत.

या अपघात प्रल्हाद बिटले, (चनेगाव ता. बदनापूर), प्रल्हाद महाजन (चनेगाव), नारायण निहाळ, नंदा तायडे, रंजना कांबळे (खामखेडा ता भोकरदन), ताराबाई भगवान मालुसरे आणि चंद्रकला अंबादास घुगे (चनेगाव ता बदनापूर) यांचं निधन झालं आहे.

Pune : अंत्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला; चिरडून तीन जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला असलेले वारकरी जालन्यात उतरले आणि या ठिकाणी त्यांनी टॅक्सी जीप केली. यावेळी जालना येथून राजूरकडे जाताना तुपेवाडी शिवारामध्ये समोरून दुचाकी सर आल्याने जीप चालकाचे नियंत्रण सुटून ही जीप थेट विहिरीत कोसळली.

यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यात सहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश मिळालं. मात्र या घटनेत 7 जणांचा बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेत चालक बाचावला असून त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना मोफत उपचार दिले जाणार जाणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply