
Jalna : जालनामध्ये दुचाकी आणि कारच्या अपघातामध्ये तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॉलमध्ये शॉपिंग करुन घराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. जालना शहरातील मंठा-अंबड बायपास मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानच्या रेल्वे उड्डान पुलावर हा भीषण अपघात झाला. कारने दुचाकीला जोरदारच्या धडक दिली. या अपघातामध्ये तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. या अपघातामध्ये नुरेन फातेमा सादेक शेख (7 वर्षे), आयेजा फातेमा सादेक शेख (5 वर्षे), अदाबिया फातेमा सय्यद शोएब (9 वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर सय्यद शोएब आणि अन्य एक मुलगा जखमी झाला आहे.
रविवारची सुट्टी असल्याने तट्टूपुरा मुजाहेद चौक येथे राहणारे सय्यद शोएब हे आपल्या मुलांसोबत दोन भाच्यांना मोतीबागेत खेळण्यासाठी घेऊन गेले होते. या मुलांचे खेळून झाल्यानंतर ते शॉपिंगसाठी त्यांना मॉलमध्ये घेऊन गेले.
शॉपिंग झाल्यानंतर ते संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मॉलमधून बाहेर पडले आणि दुचाकीवरुन घराकडे जात होते. त्याचवेळी रेल्वे उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात सर्वजण रस्त्यावर पडले. या अपघातामध्ये तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सय्यद शोएब आमि एक मुलगा जखमी झाला.
सय्यद शोएब यांच्या डोळ्यासमोरच त्यांची मुलगी आणि दोन भाच्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला. अपघातामध्ये सय्यद शोऐब आणि एक मुलगा हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सय्यद शोऐब यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. जालना पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

