Bus Accident : कोळेगाव घाटरस्त्यात बस २० फूट खोल दरीत कोसळली; पंधरा प्रवासी जखमी

Jalna : जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला कोळेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. कोळेगाव घाटरस्ता चढताना चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट २० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये बसमधील १५ ते १६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जालन्यातील जाफ्राबाद येथून प्रवाशी घेऊन राज्य परिवहन महामंडळाची बस चिखलीकडे मार्गस्थ झाली. या बसला कोळेगाव फाट्याजवळ अपघात झाला. जाफ्राबाद- चिखली रोडवरील कोळेगाव फाट्याजवळ हा अपघात सकाळच्या सुमारास झाला. कोळेगाव फाट्याजवळील घाट रस्ता चढत असताना बस साधारण २० ते २५ फूट खोल खड्ड्यात जाऊन उलटी झाली.

Pune Bridges : पुण्यातील ओढे-नाले, कालव्यांवरील पुलांचे होणार "स्ट्रक्चरल ऑडीट", सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होणार पाहणी

चालकाचे नियंत्रण सुटले

घाट रस्ता चढत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बस खड्ड्यात उलटी झाल्यानंतर बसमधील प्रवाशांची येथे प्रचंड आरडाओरड सुरु झाली होती. या अपघातात बसमधील साधारण १५ ते १६ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत असून जखमींना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

नागरिक धावले मदतीला

बस खड्ड्यात कोसळल्यानंतर प्रवाशांची आक्रोश सुरु झाला होता. तसेच बस पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेतली. तसेच मार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधील नागरिकांनी देखील मदतीसाठी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply