Jalgaon News : काम नसल्याने बेरोजगार तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News :  रोजंदारीने काम करत असताना सद्यस्थितीला कोणतेही काम नसल्याने बेरोजगार असलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये समोर आली आहे. हा तरुण उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्ताने जळगावमध्ये आलं होता. 

रंजन प्रसाद मौर्य (वय ३२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव, मूळ रा. संत रविदासनगर, बदुही, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर घटना ३ जूनला सकाळी उडकीस आली. रंजन मौर्य हा पूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करीत होता. सध्या महिन्याभरापासून त्याच्याकडे कुठलेच काम नसल्याने तो घरीच होता. जळगावच्या एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कॉलनीत तो खोली करून एकटाच राहत होता. 
 
काम नसल्याने घरात एकटाच असलेल्या रंजन याने रात्री एकनंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. सकाळी आठला त्याच्यासोबतच्या कामगारांना तो बाहेर दिसून आला नाही. यामुळे खोलीवर गेले असता, तो दरवाजा उघडत नव्हता. शेजाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले, तर रंजन मौर्य गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
 
मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply