Jalgaon News : ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले पडले बंद; जळगावचे जिल्हाधिकारी म्हणतात

Jalgaon News :  जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले होते. त्यामुळे खळबळ माजली आहे, मात्र डिस्प्ले बंद झाले असले तरी सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध तसेच व्हिडिओ शूटींग केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

आज सकाळी 9 वाजेपासून ते 9.4 मिनिटापर्यंत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद पडले होते. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोन वरून कळवली माहिती दिली त्याला, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे.

Weather Update : पुढील 24 तासांमध्ये मुंबई गारेगार होण्याची शक्यता, हलक्या पावसाचा अंदाज; आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन बंद

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटोर वरून इन्व्हर्टर वर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेरेचे डिस्प्ले बंद झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.डिस्प्ले बंद झाले असले तरी मात्र सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या काळातील व्हिडिओ शूटिंग देखील केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply