Jalgaon News: मध्य रेल्वेवर मोठी दुर्घटना टळली, रात्रीच्या अंधारात पटरीवर ठेवले होते दगड

Train Accident Shocking : जळगाव जिल्ह्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. जिथे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे रुळांवर आणि रुळांच्या मधोमध दगड ठेवण्यात आले होते. ही संपूर्ण घटना वेळेत लक्षात आल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना

ही दुर्घटना(Accident) रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि तत्परता यामुळे टळली आहे. दरम्यान, हा प्रकार घडवून आणणाऱ्या व्यक्तींचा उद्देश काय होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. हा प्रकार अपघात घडवण्यासाठी मुद्दाम केला होता का? की केवळ खोडसाळपणातून कोणी असं कृत्य केलं? याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेतला जात आहे.

नेमके हे कधी लक्षात आले?

म्हसावद स्थानक परिसरात रेल्वे कर्मचाऱ्यांनी दररोजच्या तपासणीदरम्यान रुळांवर दगड आढळल्याचे लक्षात घेतले. हे दगड केवळ रुळांच्या बाजूला नव्हते, तर थेट दोन रुळांमध्ये अडकवले गेले होते. हे पाहताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. रेल्वेच्या यंत्रणांनी तत्काळ या भागातील संपूर्ण रुळांची तपासणी करून दगड हटवले आणि अपघात टाळण्यात यश मिळवलं.

व्हिडिओ (Shocking Video) पाहताच नेटकऱ्यांमध्ये धडकी भरली होती शिवाय अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''भारतात याआधी अशा गोष्टींमुळे अपघात घडले होते'' तर अनेकांनी हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply