Jalgaon Water Crisis : पाणीटंचाईची झळ; जळगाव जिल्ह्यात ३७ गावांमध्ये उपाययोजना

Jalgaon : राज्यात पाणी टंचाईची समस्या अधिक गडद होत चालली आहे. एप्रिल महिण्याच्या तुलनेत आता अधिक पाणी टंचाई जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून देखील उपाययोजना वाढविण्यात येत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील ३७ गावांना पाणीटंचाईची समस्या अधिक गडद होत चालली असून याठिकाणी ट्रॅकर तसेच विहिरींचे अधिग्रहण करून गावांची तहान भागविली जात आहे.

उन्हाची तीव्रता जशी वाढत आहे. तशीच पाणीटंचाईची समस्या देखील गडद होत चालली आहे. यामुळे महिला, नागरिकांना पाणी आणण्यासाठी दूरवर पायपीट करत जावे लागत आहे. राज्याच्या अनेक भागात हि टंचाई वाढत असून जळगांव जिल्ह्यात देखील पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात चार तालुक्यात मिळून ३७ गावांमध्ये पाणी संकट निर्माण झाले आहे.

Washim : लिंबू म्हणून दिलेली रोपं ईडलिंबूची; समितीच्या अहवालतून स्पष्ट, कृषी केंद्राकडून फसवणूक

भूजल पातळीत झपाट्याने घट

जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशावर कायम असल्याने प्रकल्पासह भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. यामुळे पाणीटंचाई जाणवत असून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी नियोजन केले गेले आहे. टंचाईच्या तीव्रतेचा विचार करून उपाययोजना म्हणून या गावांसाठी टँकर, कूपनलिका, विंधन विहिरी अधिग्रहण करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सात गावांसाठी ८ ट्रॅकर सुरु

जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये पाणी समस्या निर्माण झाली असून यातील ७ गावांना ८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर ३१ गावात विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये चाळीसगाव तालुक्यात ३, अमळनेर तालुक्यात २ जामनेर, भडगाव तालुक्यात प्रत्येकी १ गावासाठी १ टँकर अशा सात गावांसाठी ८ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर जामनेर तालुक्यात ६, एरंडोल १, मुक्ताईनगर, चाळीसगाव व पाचोऱ्यासाठी प्रत्येकी चार, अमळनेर ८, पारोळा ४ अशा ३१ गावांसाठी ३१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply