Jalgaon Accident : आईला बोलून घरातून निघाला अन्; भरधाव गाडीने दुचाकीला उडविले, दोघांचा मृत्यू

Jalgaon : अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यातच जळगाव - पाचोरा रस्त्यावर भीषण अपघात झाला. यात भरधाव वेगाने आलेल्या जीपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. जीपची धडक बसल्यामुळे दुचाकीवरील तिघेजण दूरवर फेकले गेले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जळगाव- पाचोरा रस्त्यावरील वावडदा गावाजवळ असलेल्या वळणाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाथरी येथील भावेश गोरख पाटील (वय ३८) व महेंद्र उर्फ योगेश वसंत जाधव (वय ३८) या तरुणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पाथरी येथील भावेश पाटील, महेंद्र जाधव हे दोघेही गावातीलच संदीप शांताराम भिल (वय ३५) याच्यासोबत गावातून जळगावी कामानिमित्त येण्यासाठी निघाले होते. गावातून निघाल्यावर काही अंतरावर येताच वावळदा गावाजवळील वळणावर जीपने जोरदार धडक दिली.

Jyotirao Phule : मुलींसाठी पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली, महात्मा फुलेंनी अनुकरण केले - उदयनराजे भोसले

दोघांचा मृत्यू, एकजण जखमी

जीपचा वेग अधिक असल्याने धडक बसताच दुचाकीवरील तिघेजण फुटबॉलसारखे दूर अंतरावर फेकले गेले. यात भावेश पाटील याचा जागीच मृत्यू झाला होता. तर महेंद्र जाधव आणि संदीप भिल अशा दोघांना जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथे उपचार होण्यापूर्वीच महेंद्र जाधव यांचा देखील मृत्यू झाला. तर संदीप भिल याच्यावर सध्या तिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

आईची शुद्ध हरपली

अपघात झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. तर पाथरी गावातबातमी समजताच पाथरीवासीयांनी घटनास्थळी आणि जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. भावेश पाटील, महेंद्र जाधव दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान मृत भावेश हा खासगी प्रवासी बसवर चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार गेला असून आईच्या वृद्धापकाळाचा आसरा हिरावून गेला आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने भावेशच्या आईची शुद्ध हरवली होती.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply