Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार

 

Jalgaon: लग्न सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करत असतात. मात्र लग्न सोहळा आटोपल्यानंतर शेवटच्या पंगतीमध्ये जेवणासाठी बसलेल्या नवरदेवाच्या आईजवळ असलेली दागिन्यांची पिशवी घेऊन चोरटा पसार झाला. सदरची घटना चाळीसगाव शहरात आयोजित एका विवाह समारंभात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून तपास सुरु करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनील पाटील यांच्या कन्येच्या लग्नात हा चोरीचा प्रकार घडला आहे. सदरचा विवाह सोहळा चाळीसगाव शहरातील धुळे रस्त्यावर विराम लॉन्स याठिकाणी पार पडला. पण लग्न लागल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत नवरदेवाची आई अंजली पाटील या जेवायला बसल्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ सुमारे साडेदहा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी होती. हि पिशवी त्यांनी एका खुर्चीजवळ ठेवली.

चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद

लग्नात वेगवेगळ्या नऊ प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी नवरदेवाची आई अंजली पाटील यांच्याकडे होती. जेवण करत असताना त्यांनी ही पिशवी खुर्चीजवळ खाली ठेवली होती. हि संधी साधत अल्पवयीन असलेल्या चोरट्याने त्यांची नजर चुकवून दागिन्यांची पिशवी लांबवली. हा सर्व प्रकार लॉन्समध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये धाडसी चोरी

नाशिक रोडच्या शिखरेवाडी परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील गोडसे यांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील गोडसे यांच्या बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातून साडे सोळा लाख रुपये किमतीचे २८ तोळ्यांचे दागिने भरदिवसा चोरले आहे. या घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून दुचाकीवर आलेले हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. पुढील तपास आता उपनगर पोलीस करत आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply