Accident News: पुण्याला जाण्यासाठी घाईत निघाले, वाटेत काळाने घाला घातला; स्कूल बसच्या धडकेत काकी-पुतण्याचा जागीच मृत्यू

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघातामध्ये काकी-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यावल तालुक्यातील कोरपावली येथे हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या भरधाव स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये काकी आणि पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा तपास जळगाव पोलिस करत आहेत.

यावल तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली. कोरपावली येथील निशा जितेंद्र येवले (२० वर्षे) आणि विशाल कुशल येवले (१७ वर्षे) या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. काकी आणि पुतण्या दुचाकीवरून यावलच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. कृषी फलोत्पादन केंद्राजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या स्कूल बसने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात स्कूल बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bogus Cotton Seeds : नंदुरबारमध्ये ३ लाखांचे बोगस बियाणे जप्त; खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरपावली येथून विशाल काकी निशाला यावल बसस्थानकावर सोडण्यासाठी जात होता. निशाला पुण्याला जायचे होते त्यामुळे विशाल तिला दुचाकीवरून सोडण्यासाठी जात होता. यावल तालुका कृषी कार्यालयासमोर स्कूलबसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचे मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

कुशल पांडुरंग येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्कूल बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. या अपघाताचे ठिकाण हे खड्डेमय आणि वळणाचे असल्याने वाहन चालकाचा ताबा सुटण्याची शक्यता असून यामुळेच ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित यावल पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे येवले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply