Jaipur Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी राजस्थान हादरलं; जयपूरमध्ये ४.४ रिश्टर स्केलचे तीन धक्के, नागरिक भयभीत

Rajasthan Jaipur Earthquake: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. अर्ध्या तासांत जयपूर शहराला तीनवेळा भूकंपाचा हादरला जाणवला. हा भूकंप इतका जोरदार होता की लोकांना स्फोटक आवाज ऐकू आला. यानंतर घाबरलेले लोक घर आणि अपार्टमेंटमधून बाहेर आले.

यादरम्यान काही मुले रस्त्यावर बसून हनुमान चालीसाचे पठण करताना दिसली. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता भूकंपाची तीव्रता ३.४ ते ४.४ इतकी होती.

Raigad : अंबा नदी पुलाजवळील रस्त्याचे डांबर गेले वाहून; २ महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता महामार्ग

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी जयपूर शहरात एका तासाच्या कालावधीत तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे ४.२५ वाजेच्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का बसला. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी होती.

या भूकंपाची खोली १० किलोमीटर इतकी होती. त्याचवेळी दुसरा धक्का पहाटे ४.२३ वाजता आणि तिसरा धक्का पहाटे ४.२५ वाजता बसला. भूकंपाचे सलग तीन धक्के बसल्यानंतर नागरिक घाबरून घराबाहेर पडले. यादरम्यान काही मुले रस्त्यावर बसून हनुमान चालीसाचे पठण करताना दिसली.

दुसरीकडे मणिपूरमध्येही शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मणिपूरच्या उखरुलमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी मोजली गेली. मणिपूरमध्येही या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply