IT Raid in Akola : अकाेल्यात आंगडिया कार्यालयावर 'आयकर'ची धाड; नांदेडच्या 'त्या' कारवाईचे धागेदोरे?

IT Raid in Akola : अकोला येथील कोठडी बाजारातील एका आंगडीया कुरियर सर्व्हिसच्या कार्यालयात आयकर विभागाने आज (बुधवार) छापा टाकला. सकाळपासून आयकर विभागाच्या पथकाकडून कुरियरच्या कार्यालयातील कागपदत्रांची तपासणी सुरु आहे. केल्या जात आहे. या कार्यालयातील तपासणीचे नांदेडमध्ये झालेल्या आयकर धाडीशी कनेक्शन असल्याची माहिती कळत आहे.

कुरियरच्या माध्यमातून मोठ्या रकमांचा व्यवहार झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळेच ही तपासणी सुरू असल्याचे समजते. या छाप्याबाबत मोठी गोपनियता बाळगण्यात आली आहे. अद्याप काेणीही या तपासणीत नेमकं काय काय केले जात आहे याची अधिकृत माहिती देण्यासाठी कुणीच पुढे आलेलं नाही. दरम्यान अकाेला येथील आणखी काही कुरियर कंपन्यांवर आयकर विभाग धाड टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान नांदेडमध्ये असलेल्या संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता अकोल्यात आयकर विभागाकडून अकोल्यातल्या कोठडी बाजारातील एका कुरियर सर्व्हिसवर धाडी टाकत तपासणी केली जात असल्याने तसेच आयकर विभागाची दाेन वाहने रस्त्यावर उभी असल्याने बाजारपेठेत चर्चा सुरु आहे.

...तर कारवाई हाेणार

नागपुर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी मोहीम सूरू आहे. दरम्यान आयकर विभागाच्या दरवर्षी तपासणी मोहीम सुरू असते, मागीलवर्षी देखील काही उद्योजक, व्यापारी तसेच कोचिंग क्लासेसवर देखील तपासणी केली होती. तपासणी मोहीम नंतर काही त्रुटी आढळल्या तर त्यांच्यावर कारवाया केल्या जातात.

आजच्या आंगडीया कुरियर सर्व्हिसवर तपासणी सुरू असून काही त्रुटया आढल्यास पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यत बारकाईने ही कुरियर सर्व्हिसवर बंददाराड़ ही तपासणी सुरू आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply