ISRO LVM-3 : इस्रोचा नवा विक्रम! 36 सॅटेलाइटसह सर्वात वजनदार रॉकेट LMV-3 लॉन्च; जगाला मिळणार उत्तम कनेक्टिव्हिटी

ISRO LVM-3: इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गोला आहे. इस्रोने आज आपले सर्वात वजनदार रॉकेट LVM-3 प्रक्षेपित केले. यूके कंपनी वनवेबचे ३६ ब्रॉडबँड उपग्रहासह आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटा येथून हे रॉकेट लॉन्च करण्यात आले.

इस्रोचे 43.5 मीटर लांब रॉकेट रविवारी सकाळी 9 वाजता चेन्नईपासून 135 किमी अंतरावर असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून 24.5 तासांच्या उलटी गणतीनंतर लॉन्च करण्यात आले. भारती एंटरप्रायझेस ही वनवेब ग्रुपमधील प्रमुख गुंतवणूकदार आहे. OneWeb हे एक ग्लोबल कम्युनिकेशन नेटवर्क असून ते सरकार आणि उद्योगांना कनेक्टिव्हिटी प्रदान करते.

इस्त्रोच्या या कामगिरीमुळे आता जगाला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होणार आहे. ब्रिटनच्या नेटवर्क एक्सेस असोसिएट्स लिमिटेड वनवेब ग्रुप कंपनीने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ७२ उपग्रह स्थापित करण्यासाठी इस्रोच्या व्यावसायिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेडसोबत करार केला आहे.

सलग पाचवी यशस्वी मोहीम

इस्रोने या मोहिमेला LVM3-M3/OneWeb India-2 मिशन असे नाव दिले आहे. इस्रोच्या या रॉकेटची क्षमता लो अर्थ ऑर्बिटमध्ये 10 टन आणि जिओ ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये 4 टन आहे. LMV3 ची ही सलग पाचवी यशस्वी मोहीम आहे. चांद्रयान-2 मोहिमेचाही यात समावेश आहे.

वनवेबसाठी दुसऱ्यांदा लॉन्चिग

याआधी इस्त्रोकडून वनवेबसाठी पहिले ३६ उपग्रह २३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. दरम्यान या मोहिमेविषयी माहिती देताना इस्रोने एक नोटिफिकेशन जारी करून म्हटले की LVM-M3/OneWeb India-2 मिशनसाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. इस्रोसाठी ही 2023 मधील हे दुसरी मोहिम आहे.

OneWeb ने एका निवेदनात सांगितले की, 18 वे लॉन्चिंग पूर्ण झाले आहे. आणखी 36 उपग्रह प्रक्षेपित केल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केलेल्या त्यांच्या उपग्रहांची संख्या 616 पर्यंत वाढली आहे. यामुळे या वर्षी जागतिक सेवा सुरू करण्यासाठी हे पुरेसे आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply