Israel Hamas War : इराण- इस्रायलमध्ये तणाव; दोन्ही देशांचा प्रवास टाळा... भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध सुरू आहे. इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यानुसार पुढील सूचना येईपर्यंत इराण आणि इस्रायल या देशांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इराण आणि इस्रायल या दोन्ही देशात सध्या तणावाची परिस्थिती आहे. याबाबत खबरदरी म्हणून परराष्ट्र मंत्रालयाकडून इराण आणि इस्रायलसाठी प्रवास करण्याबाबत सल्लागार सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सरकारकडून पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व भारतीयांना इराण किंवा इस्रायलला न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Shirur Latest News : आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा; गरोदर मातेच्या पोषण आहारात आढळली कीड

तसेच सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधण्याच्या आणि नोंदणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुढील ४८ तास महत्वाचे असल्याने खबदारी म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने हे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 'X' या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे ट्वीट..

इराण आणि इस्रायल प्रदेशातील प्रचलित परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण किंवा इस्रायलला प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जे सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये वास्तव्य करत आहेत त्यांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा आणि स्वतःची नोंदणी करावी. त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आणि त्यांच्या गरज असेल तरच बाहेर पडण्याची विनंती केली जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply