Irshalwadi Landslide Update : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेचं बचावकार्य कायमचं थांबवलं; ५७ जण अद्यापही बेपत्ता

Irshalwadi News : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील  मृतांचा आकडा २७ वर पोहचला आहे. तर ५७ जण अद्याप बेपत्ता आहेत. चौथ्या दिवशी देखील बचावकार्य युद्धपातळीवर सुरु होते. पण आता हे बचावकार्य थांबवण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.

घटनास्थळावर सतत पडणारा मुसळधार पाऊस आणि धुक्यांमुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अशामध्ये आता ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे. शोध कार्यामध्ये मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत. त्यामुळे शोधकार्य  थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेपत्ता दरडग्रस्तांना मृत घोषीत केले जाणार आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, इर्शाळवाडी येथील शोध मोहीम आजपासून थांबवण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जाहीर करण्यात आले. खालापूर पोलीस ठाण्यात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत शोध मोहीम थांबण्यात आले असल्याचे जाहीर केले.

Pune Crime: संतापजनक! खडकवासला परिसरात हॉटेलची तोडफोड करत लुटले पैसे; कारवाईस आलेल्या पोलीस निरीक्षकालाही मारहाण

उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, '२७ मृतदेह सापडले आहेत. ५७ जण बेपत्ता आहेत त्यांना मृत घोषीत करण्यात आले. यांना मृत घोषीत करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल. त्यांना सिडकोमध्ये घरं देता येतील का? याबाबत मुख्यमंत्री निर्णय नक्की घेतील. दरडग्रस्तांची अवहेलना होणार नाही.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply