IRCTC ची या 25 मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये ई-पॅन्ट्री, ऑनलाईन जेवण बुक करता येणार

मेल-एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या,ज्या गाड्यांच्या तिकिटामध्ये जेवण समाविष्ट नाही अशा प्रवाशांच्या सोयीसाठी IRCTC ने ई-पॅन्ट्री ऑनलाईन जेवण बुकिंग सेवा सुरू केली आहे. ही एक डिजिटल सुविधा असून पॅन्ट्री कार असलेल्या निवडक गाड्यांमध्ये प्रवासापूर्वीच जेवण बुक करता येणार आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुखकर व तणावमुक्त होणार आहे.

ही सेवा IRCTC च्या तिकीट बुकिंग संकेतस्थळावर www.irctc.co.in वर मिळणार आहे. कन्फर्म, RAC तसेच अंशतः कन्फर्म तिकीटधारक प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. प्रवाशांना जेवण आणि रेल नीर यांची आगाऊ बुकिंग करता येणार आहे. हे जेवण प्रवासादरम्यान पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांमार्फत थेट त्यांच्या आसनावर वितरित केले जाणार आहे.

ई-पॅन्ट्री सेवेची प्रक्रिया

बुकिंग: तिकीट बुक करताना किंवा “Booked Ticket History” या पर्यायातून प्रवासी ई-पॅन्ट्री जेवण पर्याय निवडू शकतात.

पुष्टीकरण: बुकिंग झाल्यानंतर प्रवाशांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पुष्टी संदेश व Meal Verification Code (MVC) प्राप्त होतो.

जेवण वितरण: प्रवासाच्या दिवशी MVC विक्रेत्यास दाखवल्यानंतर पूर्व-बुक केलेले जेवण प्रवाशांच्या आसनावर दिले जाते.

ई-पॅन्ट्री सेवेची वैशिष्ट्ये

डिजिटल जेवण बुकिंग: मानक जेवण व रेल नीरची सुलभ ऑनलाईन आगाऊ बुकिंग.

कॅशलेस पेमेंट: प्रवासादरम्यान रोख व्यवहाराची गरज नाही; पूर्णपणे डिजिटल पेमेंट सुविधा.

प्रमाणित वितरण: MVC द्वारे योग्य प्रवाशालाच जेवण मिळण्याची खात्री.

पारदर्शकता आणि देखरेख: डिजिटल डॅशबोर्डद्वारे पारदर्शकता, जबाबदारी व कर अनुपालन सुनिश्चित.

जेवण न मिळाल्यास परतावा : बुक केलेले जेवण न मिळाल्यास प्रवाशांना परताव्याची सुविधा. रद्दीकरण आणि  परताव्याची माहिती ई-मेल, एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिली जाईल.

या सेवेचा प्रारंभिक प्रयोग विवेक एक्सप्रेस ( गाडी क्रमांक 22503/04 ) या भारतातील सर्वाधिक लांब अंतर कापणाऱ्या गाडीवर करण्यात आला होता. सध्या ही सेवा 25 मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

ई-पॅन्ट्री सुविधा असलेल्या गाड्यांची यादी

ट्रेन क्रमांक –  22503-04 – विवेक एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12483-84 – अमृतसर–कोचुवेली एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12561-62 – जयनगर–नवी दिल्ली स्वातंत्र्य सेनानी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12817-18 – हटिया–आनंद विहार स्वर्णजयंती एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 18237-38 – कोरबा–अमृतसर छत्तीसगड एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12791-92 – सिकंदराबाद–दानापूर एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12889-90 – टाटानगर–एसएमव्हीबी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12987-88 – अजमेर–सियालदह सुपरफास्ट एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12649-50 / 12629-30 – कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12617-18 – मंगलदीप एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 18477-78 – कलिंग उत्कल एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12779-80 – गोवा वास्को एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12533-34 – लखनऊ–सीएसएमटी पुष्पक एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12925-26 – मुंबई सेंट्रल–अमृतसर पश्चिम एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 11061-62 – लोकमान्य टिळक टर्मिनस–जयनगर एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 16345-46 – लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12615-16 – नवी दिल्ली–चेन्नई ग्रँड ट्रंक एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12493-94 – पुणे–निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 20805-06 – विशाखापट्टणम–नवी दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12303-04 / 12381-82 – हावडा–नवी दिल्ली पूर्वा एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 14005-06 – आनंद विहार–सीतामढी लिच्छवी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12129-30 – पुणे–हावडा आझाद हिंद एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12919-20 – इंदूर–श्री माता वैष्णो देवी कटरा मालवा एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 19483-84 – अहमदाबाद–बरौनी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक – 12801-02 – पुरी–नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्सप्रेस



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *