NIA DG : महाराष्ट्र ATS चे प्रमुख सदानंद दाते यांची NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती; मराठमोळ्या अधिकाऱ्यावर केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी

New Delhi : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी अतुलनीय शौर्य दाखविले होते. या कामगिरीसाठी त्यांचा राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात आला होता.

भारतीय पोलिस सेवेतील १९९०च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या दाते यांनी महाराष्ट्र पोलिस दलात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिस दलातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. मुंबईला लागून असलेल्या वसई-विरार तसेच मीरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. दाते यांनी केंद्रात सीबीआय तसेच सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर सेवा बजावली आहे. दाते यांना त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे २०२६ सालापर्यंत ‘एनआयए’चे महासंचालक म्हणून काम पाहता येईल.

Toll Plaza : खेड शिवापुर टोलनाक्यावर 1 एप्रिल पासुन टोल अडीच टक्क्यांनी वाढणार

सदानंद दाते यांची केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) DG पदावर नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने सदानंद दाते आणि इतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये नियुक्त्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.

सदानंद दाते, महाराष्ट्र एटीएसचे विद्यमान प्रमुख (एनआयएचे डीजी म्हणून नियुक्ती होईपर्यंत), त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये डीआयजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये आयजी (ऑप) म्हणूनही काम पाहिलं आहे. मुंबईजवळील मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांचे पोलीस आयुक्तपदही त्यांनी भूषवलेलं आहे.

सदानंद दाते गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ पोलीस सेवेत कार्यरत आहेत. आपल्या अनुभवांवर त्यांनी 'वर्दीतील माणसांच्या नोंदी' हे पुस्तक देखील लिहलेलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी पोलीस सेवेत जायचा निर्णय घेतला. यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आयएएस, आयपीएस आणि IA&AS असे तीन पर्याय होते. सदानंद दातेंनी आयपीएस हा पर्याय निवडला आणि पोलीस खात्यात रूजू झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply