Rohit Sharma SRH vs MI : मुंबई इंडियन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय... रोहित मैदानावर उतरताच करणार मोठा विक्रम

Rohit Sharma 200th Match For Mumbai Indians SRH vs MI : रोहित शर्माने डेक्कन चार्जर्सकडून आयपीएलचे तीन हंगाम खेळल्यानंतर तो 2011 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला होता. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे किंवा तो चाहत्यांचा खूप लाडका आहे का? या प्रश्नाचे उत्तर वेगळं असू शकतं. मात्र मुंबईसाठी सर्वात यशस्वी खेळाडू आणि कर्णधार को असं म्हटलं तर तो उत्तर फक्त आणि फक्त रोहित शर्मा असंच येतं.

आज, बुधवारी पुन्हा एकदा रोहित शर्मा एमआयची निळी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. मात्र सनराईजर्स हैदराबादविरूद्धचा हा सामना रोहितसाठी नक्कीच खास असणार आहे. तो या फ्रेंचायजीकडून 200 वा आयपीएल सामने खेळणार आहे. रोहितच्या उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने खूप मोठे यश पाहिले आहे. कधी कधी अपयशाचा देखील सामना केला आहे. रोहित खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्ससोबतच वाढत राहिला.

Buldhana News : शाळेत येत मुख्याध्यापकाने संपविले जीवन; जानेफळ येथील घटना

आकडे काय सांगतात?

रोहित शर्माची मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास आकडेवारीवरून सांगायचा झाला तर त्याने मुंबईकडून खेळताना 5054 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ही 29.39 इतकी असून त्यात 34 अर्धशतके आणि एका शतकी खेळाचा समावेश आहे. रोहितचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास अजून थांबलेला नाही.

मुंबईकडून खेळताना रोहितने अनेक प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र रोहितसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि केकेआर हे दोन संघ खास आहेत. या दोन्ही संघांविरूद्ध त्याने भरपूर धावा केल्या आहेत. रोहितने 34 पैकी 13 अर्धशतकी खेळी या या दोन संघांविरूद्ध केल्या आहेत.

त्याचबरोबर रोहितने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 5 अर्धशतकी तर पंजाब किंग्ज आणि आरसीबीविरूद्ध प्रत्येकी 4 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. यावरून तो प्रत्येक संघाविरूद्ध चांगली कामगिरी करतोय हे सिद्ध होतं.

रोहितची प्रत्येक हंगामातील कमगिरी

रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी गेल्या दोन हंगामात फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. मात्र यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने धडाक्यात सुरूवात केली. त्याने गुजरात टायटन्स विरूद्ध 43 धावांची खेळी केली. तो पुन्हा एकदा टी 20 क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवण्यास सज्ज झाला आहे. अखेर हे टी 20 वर्ल्डकपचे वर्ष आहे. रोहित शर्माने 2022 मध्ये 14 सामन्यात 19 च्या सरासरीने 268 धावा केल्या होत्या. तर 2023 च्या हंगामात 20 च्या सरासरीने 16 सामन्यात 332 धावा केल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply