IPL 2024 Point Table : लखनौच्या विजयामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ! CSK पहिल्यांदाच टॉप 4 मधून बाहेर

IPL 2024 Point Table Updated : पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अखेरच्या षटकात पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीएसकेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात एलएसजीकडून पराभव पत्करावा लागला आहे.

आयपीएलच्या या हंगामात सीएसकेला घरच्या मैदानावर पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट टेबलच्या टॉप चार मधून बाहेर पडला आहे. या हंगामात सीएसके प्रथमच पहिल्या चारमधून बाहेर आहे. त्याचवेळी लखनौ सुपर जायंट्सने टॉप 4 मध्ये एट्री केली आहे.

Mumbai Indians IPL 2024 : पाच पराभवानंतरही पांड्याची मुंबई करणार प्लेऑफ एट्री? फक्त करावे लागेल 'हे' काम

लखनौ सुपर जायंट्सने 8 पैकी 5 सामने जिंकले असून 10 गुणांसह ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. सीएसके 8 सामन्यांमधला हा चौथा पराभव आहे. चेन्नई सुपर किंग्जचे 4 विजयांसह 8 गुण असून ते पाचव्या स्थानावर घसरले आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या जवळपास पोहोचली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने 8 पैकी 7 सामने जिंकून 14 गुणांसह आपले अव्वल स्थान मजबूत केले आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स 7 पैकी 5 विजयांसह 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादचेही 10 गुण आहेत पण नेट रनरेटच्या आधारावर ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचे 8 गुण आहेत आणि ते सीएसके नंतर सहाव्या स्थानावर आहे, तर मुंबई 8 पैकी 3 विजयांसह 6 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स 8 पैकी 3 विजयांसह आठव्या स्थानावर आहे, तर पंजाब किंग्ज 8 पैकी 2 विजयांसह नवव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 पैकी 7 सामने गमावले आहेत. आरसीबी 2 गुणांसह गुणतालिकेत 10व्या स्थानावर आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply