IPL 2024 Playoffs Scenario : राजस्थानच्या विजयानंतर प्लेऑफच्या शर्यतीत उरल्या फक्त 6 टीम, 4 संघांच्या गाडीला लागला ब्रेक?

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल 2024 चा 38 वा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्याची नितांत गरज होती. मात्र या सामन्यात राजस्थानने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्यामुळे हार्दिकला मोठा धक्का बसला आहे.

मुंबईने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्याचा मार्ग खूप कठीण झाला आहे. दुसरीकडे, राजस्थानने देखील 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. या सामन्याने प्लेऑफचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. राजस्थानच्या विजयामुळे प्लेऑफच्या शर्यतीत 4 संघांच्या गाडीला जवळपास ब्रेक लागला आहे.

या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने सात सामने खेळले होते, त्यापैकी 3 सामने जिंकले आणि गुणतालिकेत ते सातव्या स्थानावर होते. याशिवाय राजस्थान रॉयल्सचा संघ सात पैकी सहा सामने जिंकून अव्वल स्थानावर विराजमान होता. आता मुंबईने 8 सामन्यांत 3 विजय मिळवले असून गुणतालिकेत ते सातव्या स्थानावर आहे.

RR Vs MI IPL 2024 : 'प्रत्येकाने आपली भूमिका बजावावी...' पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या खेळाडूंवर संतापला

दुसरीकडे, राजस्थान अजूनही 7 विजयांसह अव्वल स्थानावर आहे. सॅमसनची सेना एक सामना जिंकताच ते प्लेऑफसाठी पात्र ठरेल. अशा स्थितीत राजस्थान प्लेऑफ खेळणार हे निश्चित मानले जात आहे. राजस्थान व्यतिरिक्त 5 संघ देखील शर्यतीत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स आहेत.

मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. मुंबई व्यतिरिक्त, तीन संघ आहेत ज्यांच्यासाठी प्लेऑफ खेळणे मुंबईपेक्षा कठीण आहे. दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुर हे तीन संघ आहेत. आरसीबीला प्लेऑफ खेळणे जवळपास अशक्य वाटते. बेंगळुरूने 8 सामने खेळले आहेत, मात्र एकच सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत आरसीबीने सर्व सामने जिंकले तरी त्यांचे अवघड दिसत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply