RR vs MI IPL 2024 : 'प्रत्येकाने आपली भूमिका बजावावी...' पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या खेळाडूंवर संतापला

IPL 2024 Mumbai Indians Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीगच्या सतराव्या हंगामातील 38 व्या सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला होता.

या सामन्यात पूर्णपणे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा दबदबा पाहिला मिळाला, ज्यामध्ये संदीप शर्माने 5 बळी घेतले आणि यशस्वी जैस्वालने शतक ठोकले. मुंबई इंडियन्सचा या आयपीएल मोसमातील 8 सामन्यांनंतरचा हा पाचवा पराभव असून आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग त्यांच्यासाठी कठीण झाला आहे. या सामन्यात संघाच्या पराभवाचे मुख्य कारण डावाच्या सुरुवातीलाच विकेट गमावल्याचे हार्दिक पांड्याने सांगितले.राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, आमच्या डावाच्या सुरुवातीला आम्ही 20 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या.

CSK Vs LSG IPL 2024 : पराभवाची परतफेड करण्यास चेन्नई सज्ज! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध 5 दिवसांत दुसरा सामना

त्यावेळी आम्ही 180 धावांपर्यंत पोहोचू शकू असे वाटले नव्हते पण तिलक आणि नेहल यांनी चांगली फलंदाजी केली. पण आम्ही आमचा डाव अपेक्षेप्रमाणे संपवू शकलो नाही. ज्यात आम्ही 10 ते 15 धावा कमी केल्या. राजस्थानने या सामन्यात खेळाच्या प्रत्येक विभागात आमचा पूर्णपणे पराभव केला.

आपल्या वक्तव्यात हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, या सामन्यात आम्ही केलेल्या चुका सुधारल्या पाहिजेत आणि भविष्यात त्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पुढे जाणे महत्त्वाचे असून आपल्यातील उणिवा स्वीकारून त्यावर काम करावे लागेल. मी खेळाडूंवर जास्त टीका करण्यावर विश्वास ठेवत नाही, मी त्यांना पूर्ण पाठिंबा देतो जेणेकरून चांगले क्रिकेट खेळता येईल. आपण आपल्या योजनेवर ठाम राहून मूलभूत चुका टाळल्या पाहिजेत.

मुंबई इंडियन्सला 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांचा पुढील सामना खेळायचा आहे, तर संघ सध्या 6 गुणांसह गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply