IPL 2024: डी-कॉक-पूरनचं आक्रमण अन् मयंक यादवचा वेग, लखनऊने RCB ला घरच्याच मैदानात केलं चीतपट

IPL 2024, LSG vs RCB: क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, एका खेळाडूच्या जिवावर सामना जिंकला जाऊ शकत नाही, हे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला उमगले असावे. आयपीएल 2024 चा 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला अन् पुन्हा एकदा घरच्याच मैदानात आरसीने पराभव स्विकारला.

आयपीएल 2024 स्पर्धेत घरच्या मैदानात पहिल्यांदा पराभूत होणारा संघ...पहिल्यांदाच सर्वबाद होणारा संघ... असे कोणालाही न आवडणारे रेकॉर्ड आरसीबीने यंदा सुरुवातीलाच नावावर केलेत. आरसीबी सलग दुसऱ्यांदा घरच्या मैदानात पराभूत झालेत.

खरंतर आरसीबीला याआधी फक्त गोलंदाजांच्या सातत्याची चिंता होती, पण यावेळी त्यांना फलंदाजांच्या फॉर्मबद्दलही चिंता सतावत असेल. याउलट लखनऊ सुपर जायंट्स मात्र आपल्या कामगिरीवर खुश असतील. आरसीबीला त्याच्याच घरच्या मैदानावर मात देण्यात त्यांनी यश मिळवलंय, लखनऊसाठी 21 वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादव हुकमाचा एक्का ठरतोय.

IPL 2024 Two Match Changes : आयपीएलच्या दोन सामन्यांत बदल ; कोलकतामधील लढत १७ ऐवजी १६ एप्रिल रोजी

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर 15 व्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकला होता. त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्या दोन सामन्यात शांत असलेल्या क्विंटन डी कॉकच्या बॅटमधून या सामन्यात खणखणीत शॉट्स पाहायला मिळाले. त्याने सुरुवातीलाच केलेल्या आक्रमणामुळे पहिल्या पाच षटकातच लखनऊने ५० धावा स्कोअरबोर्डवर लावल्या होत्या.

मात्र, पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात केएल राहुलला ग्लेन मॅक्सवेलने 20 धावांवर बाद केलं. त्यानंतर मधल्या षटकात आरसीबीच्या गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केलेला. पडीक्कलही सिराजच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात ६ धावांवरच बाद झाला होता. तर मार्कस स्टॉयनिसही 24 धावांची छोटेखानी खेळी करत मॅक्सवेलच्याच गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

या विकेट्स जात असतानाही डी कॉक मात्र या एका बाजूने आरसीबीच्या गोलंदाजांवर आग बरसत होता. त्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडत होता. पण अखेर 17 व्या षटकात रिस टोप्लीने त्याच्या वादळाला रोखलं. डी कॉक 56 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकार मारत 81 धावा करून बाद झाला, तर आयुष बडोनीचा अफलातून झेल फाफ डू प्लेसिसने यश दयालच्या गोलंदाजीवर घेतला.

पण पुन्हा एकदा आरसीबीला गोलंदाजीत फारसा अनुभव नसल्याचा फटका बसला. अखेरच्या दोन षटकात उपकर्णधार निकोलस पूरनने जोरदार आक्रमण केलं. 19 व्या षटकात त्याने षटकारांची हॅटट्रिक केली. त्याने शेवटच्या षटकातही 2 षटकार ठोकले. पूरनने 21 चेंडूत 5 षटकारांसह केलेल्या नाबाद 40 धावांमुळे लखनऊने 20 षटकात 5 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली.

महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या दोन षटकात पूरनने केलेली फटकेबाजी या सामन्याला कलाटणी देणारी ठरली. लखनऊ 16-170 धावांपर्यंत पोहचेल असं वाटत असतानाच त्यांनी 180 धावांचा टप्पा पार केला.

त्यानंतर बेंगळुरूचा संघ फलंदाजीला उतरला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या सलामीवीरांनी आक्रमक शॉट्स खेळत चांगली सुरुवातही केलेली. मात्र 5 व्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आलेल्या मनिमारन सिद्धार्थने विराटची विकेट घेत हा सामना अविस्मरणीय केला. त्याने विराटला 22 धावांवरच माघारी धाडले.

त्यातच पुढच्या षटकात आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार आरसीबीने केला आणि फाफ डू प्लेसिस रनआऊट झाला. पॉवरप्लेचं शेवटचं षटक मयंक यादव टाकत होता, डू प्लेसिस गेल्यानंतर त्याने आपल्या वेगानं ग्लेन मॅक्सवेललाही चकीत केलं. सातत्याने ताशी 150 किमीनं गोलंदाजी करणाऱ्या मयंकचा सामना करताना मॅक्सवेल शुन्यावर माघारी परतला.

दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघांच्या क्षेत्ररक्षकांकडून अफलातून झेल पाहायला मिळाले. तरी सामन्यात पूरनचे आक्रमण आणि मयंक यादवची 4 षटके टर्निंग पाँइंट ठरली. मयंकने ४ षटकात अवघ्या 14 धावाच दिल्या आणि 3 विकेट्सही घेतल्या. त्याचमुळे त्याने सलग दुसऱ्या सामन्याच सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.

आता या 21 वर्षीय गोलंदाजावर सर्वांचेच यापुढे लक्ष राहणार आहे. त्याने सातत्याने ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करत अनेकांचे लक्ष वेधले आहे, त्यातच जूनमध्ये टी20 वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे त्यासाठीही मयंक टीम इंडियाचे दार ठोठावू शकतो.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply