IPL 2022 : बुडत्याचा पाय खोलात! ‘तळात’ल्या चेन्नईला मोठा धक्का बसणार?

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2022 ची सुरुवात आतापर्यंत काय चागंली झाली नाही. CSK ला चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सूत्राच्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक वाईट धक्का बसणार आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर पुन्हा एकदा जखमी झाला आहे. या दुखापतीनंतर दीपक चहर आयपीएल 2022 च्या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्याचे दिसत आहे येत आहे.

दीपक चहरला यावर्षी चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दीपक चहरला मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दुखापत झाली होती. दीपक चहर तंदुरुस्त होऊन आयपीएलच्या मध्यावर पुनरागमन करेल अशी आशा चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला होती. पण आता अवघड दिसत आहे. दीपक चहर सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) असून दुखापतीतून सावरण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. पण सूत्राच्या माहितीनुसार दीपक चहरला पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे पुन्हा त्रास होत असल्याची माहिती मिळाली आहे.

दीपक चहर मुंबईत चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील होणार होता. पण आता दुखापतीची समस्या पुन्हा समोर आल्यानंतर तो संपूर्ण आयपीएल 2022 मधून बाहेर जाऊ शकतो. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फेब्रुवारीमध्ये कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दीपक चहरला दुखापत झाली होती. चेन्नई सुपर किंग्जला दीपक चहरची उणीव जाणवू लागली आहे. दीपक चहर प्रतिस्पर्धी संघांवर सुरुवातीला दबाव निर्माण करण्यात माहीर होता. चहरने आतापर्यंत IPL च्या 63 सामन्यात 59 विकेट घेतल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply