IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या अर्धशतकामुळे चाहता नोकरीला मुकणार?

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 21 व्या समन्यात सनराईजर्स हैदाराबादने गुजरात टायटन्सचा 8 विकेट राखून पराभव केला. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) यंदाच्या हंगामात दमदार सुरूवात करत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली होती. या गुजराती विजयी रथ हैदराबादी नवाबांनी थोपवला. गुजरातने 20 षटकात 162 धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार हार्दिक पांड्याचा मोलाचा वाटा होता. त्याने नाबाद अर्धशतकी खेळी (Half Century) करून संघाला सन्मानजनक स्थिती पोहचवले होते. मात्र हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी गुजरातला विजय मिळून देऊ शकली नाही. हैदराबादने हे 163 धावांचे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. केन विल्यमसनने (Kane Williamson) 57 धावांची खेळी केली.

जरी हार्दिक पांड्याच्या अर्धशतकामुळे गुजरात जिंकू शकली नसली तरी या अर्धशतकामुळे एका चाहत्यांची मात्र नाचक्की झाली. गुजरात आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान एका क्रिकेट चाहत्याने 'जर हार्दिक पांड्याने अर्धशतक ठोकले तर मी माझ्या नोकरीचा राजीनामा देईन असा फलक झळकावला होता. हार्दिक पांड्याने 42 चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकत या क्रिकेट चाहत्याला तोंडावर पाडले. आता हा चाहता खरोखर आपल्या नोकरीचा राजीनामा देणार का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरूवात चांगली झाली नव्हती. त्यांचा फॉर्ममधील असलेला फलंदाज शुभमन गिल लवकर बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर मॅथ्यू वेड देखील स्वस्तात माघारी गेला. अशा परिस्थिती हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर यांनी संघाला शतकी मजल मारून दिली. त्यानंतर युवा फलंदाज अभिनव मनोहरबरोबर हार्दिकने भागीदारी रचत गुजरातला 162 धावांपर्यंत मजल मारून दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply