IPL मध्ये धमाका करणाऱ्या बोल्टला मायदेशात मिळाला प्रतिष्ठेचा पुरस्कार

वेलिंग्टन : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दमदार गोलंदाजी करत आहे. त्याने लखनौ सुपर जायंट विरूद्धच्या सामन्यात पहिल्या षटकात दोन विकेट घेत राजस्थानच्या विजयात मोठी भुमिका बजावली. ट्रेंट बोल्ड भारतात आयपीएल गाजवत असताना मायदेशा तट्रेंट बोल्टला एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. न्यूझीलंडचा टी 20 प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार (New Zealand T20I Players of the Year) ट्रेंट बोल्ड आणि महिला टी 20 संघाची कर्णधार सोफी डिव्हाईन (Sophie Devine) यांना जाहीर झाला.

बोल्टने आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये 13.30 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या होत्या. या पुरस्कारासाठी ट्रेंट बोल्टची स्पर्धा टीम साऊदी, डेव्होन कॉनव्हॉय, डेरेल मिशेल आणि इश सोधी यांच्यात स्पर्धा होती. दरम्यान, पुरस्कार मिळाल्यानंतर ट्रेंट बोल्टने एक अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले. यात तो म्हणतो की, 'टी 20 क्रिकेट खेळताना मी खूप आनंदी असतो. मी माझ्या खेळात सुधारणा करण्यासाठी कायम नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. हा पुरस्कार माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. एखादा पुरस्कार जिंकणे खूप खास असते. मी पुरस्काराबद्दल आभार व्यक्त करतो.'

दुसरीकडे सोफी डिव्हाईनने न्यूझीलंड टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावला. तिने दोन वर्षापूर्वी हा पुरस्कार पटकावला होता. तिच्याबरोबरच एमेलिया केर (महिला) आणि मिशेल ब्रासेवेल (पुरूष) यांना सुपप स्मॅश प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply