IPL २०२२ Tickets विक्री या दिवशीपासून

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १५ व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त चार दिवस उरले आहेत. लीगचा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात शनिवारी (ता. २६) मार्च रोजी होणार आहे. अशात लीगच्या सामन्यांच्या तिकिटांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. साधारणपणे सामन्याच्या किमान दोन आठवडे आधी तिकिटे विक्री केली जातात. मात्र, यावेळी स्टेडियममधील प्रेक्षक क्षमतेबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे तिकीट विक्रीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. पुण्यासह सर्व ठिकाणी सामन्यांची तिकिटे बुधवारपासून (ता. २३) विक्रीसाठी उपलब्ध झाली पाहिजे, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले. आयपीएलचे (IPL 2022) सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना ऑनलाइन तिकिटे खरेदी करावी लागणार आहेत. स्टेडियममधील प्रेक्षकांच्या आसन क्षमतेबाबत बीसीसीआय आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. आयपीएल २०२२ साठी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत केवळ २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला आहे. तर बीसीसीआयला कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर प्रेक्षकांची आसनक्षमता ४० टक्क्यांपर्यंत वाढवायची आहे. दर्शक २३ मार्चपासून iplt20.com आणि Bookmyshow.com वर IPL 2022 साठी ऑनलाइन सामन्याची तिकिटे खरेदी करू शकतात.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply