BCCI चे टेंशन वाढले! आयपीएल काही तासांवर असतानाच पंजाबचे नवीन स्टेडियम संकटात

Punjab Stadium News: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धा आता काही तासांवर आलेली असताना पंजाब क्रिकेट संघटनेच्या नवीन स्टेडियमवरील सर्व उपक्रम थांबवण्यासाठी कायदेशील नोटीस बजावण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यावर आयपीएल 2024 मधील पंजाब किंग्स संघाचे सामने होणार आहेत.

पर्यावरण कार्यकर्ते निखिल थामन यांनी आघाडी उघडली असून या स्टेडियमची उभारणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. मुळात या स्टेडियमला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यंदाच्या आयपीएलचे पहिल्या काही दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले असून पंजाब किंग्स संघाचा पहिला सामना 23 तारखेला होणार आहे.

IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विराट करणार धमाका? दोन मोठे विक्रम करण्याची संधी

पंजाब क्रिकेट संघटनेने या नव्या स्टेडियमवरील सामने नियोजनाप्रमाणे पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र पंजाब किंग्स संघ व्यवस्थापन काहीसे चिंतेत आहे. स्टेडियमबाबतचा वाद लवकर मिटवावा, असे त्यांनी म्हटले आहे.पंजाब किंग्स संघाला अद्याप आयपीएल विजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाही त्यांच्या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. आतापर्यंत मोहालीतील स्टेडियम हे पंजाब संघाचे होम ग्राऊंड होते. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply