Indurikar Maharaj News : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे पोलिसांना आदेश

Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत. 'सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,' असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात केलं होतं.

त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.

दरम्यान, या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असून खंडपीठाने इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी अहमदनगर येथील आपल्या कीर्तनातील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केलं होतं. सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर यांनी केलं होतं. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून त्यांच्यावर टीका झाली होती.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीनं नोटीस बजावून खुलासा मागवला होता. त्यानंतर इंदुरीकरांनी उद्विग्नता व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *