Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना झटका! सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली, FIR होणार दाखल

Nagar  : गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा  यानुसार दाखल झालेला गुन्हा रद्द करावा अशी मागणी करणारी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज  यांची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका फेटाळल्याने त्यांच्यावर कायदेशिर कारवाई हाेण्याचा मार्ग माेकळा झाल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ऍड. रंजना गवांदे यांनी सांम टीव्हीशी बाेलताना दिली. 

इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनातून पुत्ररत्न प्राप्तीच्या संदर्भाने जाहीरपणे विधान केले होते. त्याविरोधात संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी नगर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती.

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजे पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानंतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या कलम 28 नुसार तक्रार केली.

BEST Worker Protest Update : अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मागण्या मान्य होताच केला जल्लोष

इंदुरीकर महाराज यांनी विविध न्यायालयात दाखल असलेला गुन्हा रद्द करावा यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आलं नाही. दरम्यान याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळल्याने त्यांच्या विराेधात आता संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालणार आहे असे वकील रंजना गवांदे यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply