Indrayani River Polluted : प्रदुषित इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, प्रशासन आजही ढिम्म

Indrayani River Polluted : इंद्रायणी नदीत शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना आज (गुरुवार) पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. मृत माशांचा खच डोहात तरंगताना ग्रामस्थांना दिसला. देहू येथील पर्यावरणप्रेमींनी देहू नगरपंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत मृत मासे एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावली. प्रशासन इंद्रायणी नदी स्वच्छ कधी करणार असा सवाल स्थानिक करु लागले आहेत. 

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा  13 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साेहळ्यासाठी राज्यातून लाखो वारकरी देहूत दाखल होतात. या वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीत वारकरी स्नान करतात.

Pune Fire News : पुण्यात भल्यापहाटे अग्नितांडव, प्रसिद्ध गॅरेजलला भीषण आग; १७ वाहने जळून खाक

सध्या नदीत मासे मरु लागले आहेत. गेल्या आठ दिवसांतील आजची ही दुसरी घटना आहे. शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याने या माशांचा खच इंद्रायणी नदीच्या डोहात तरंगत होता. पर्यावरणप्रेमी सोमनाथ मसूडगे म्हणाले देहू नगरपंचायतीने इंद्रायणी नदीची स्वच्छता करणे गरजेचे आहे. नदी प्रदुषित हाेत असल्याने भाविकांच्या आराेग्याचा प्रश्न देखील निर्माण हाेण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply