Indore Temple Accident : इंदूरमधील मंदिर दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, सरकारकडून मदत जाहीर

Indore Temple Accident: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एक विहीरी वरील छत कोसळून त्या विहिरीतून अकरा लोकांचे मृत देह बाहेर काढण्यात आले आहेत, मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आकरा जणाचा मृत्यू झाला आहे.

इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर येथील शिवमंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याने अनेक लोक विहिरीत पडले होते. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ही घटना घडली त्यावेळी मंदिरात कन्याभोज सुरू होता. या आपघातात काही मुलीही पडल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेनंतरही पायरीच्या आजूबाजूची जमीन सातत्याने खचत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात ही घटना घडली. बाल्कनीत लोक बसले होते. यादरम्यान वरील जमीन बुडाली. रामनवमी असल्याने मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती.

पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर सर्व वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि बचाव कार्य तातडीने करण्यात येत आहे. रुग्णवाहिका आणि इतर सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.

इंदूर दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply