Indian Railway : रेल्वेप्रवाशांच्या कामाची बातमी! प्रवासात 'हा' अ‍ॅप ठरतोय फायदेशीर, तक्रारीचं झटपट सोल्युशन

Pune  : माझे सीट खराब आहे, डब्यात अस्वच्छता दिसतेय, तातडीची वैद्यकीय मदत हवीय, स्लीपरच्या डब्यात ‘जनरल’चे प्रवासी येत आहेत, माझे पैसे परत मिळालेले नाहीत... अशा रेल्वेच्या संबंधांतील तक्रारीत प्रवाशांना ‘रेल मदत अॅप’ आधार ठरत आहे. या अॅपवर तक्रार केल्यानंतर प्रवाशाला पाच ते सात मिनिटांत फोन करून त्याच्या तक्रारीचे निरसन केले जाते. गेल्या दोन महिन्यांत प्रवाशांच्या नऊ हजार तक्रारींचे निरसन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्वस्त, सुरक्षित आणि आरामदायी रेल्वे प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जुलै २०१९मध्ये ‘रेल मदत’ नावाचे अॅप सुरू केले होते; पण सुरुवातीला अॅपवर नागरिकही जास्त प्रमाणात तक्रारी करीत नव्हते. सन २०२२नंतर हळूहळू या अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली. यंदा तर रेल्वे मंत्रालयाने अॅपवरील तक्रारींची दखल घेऊन तत्काळ त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pimpri Chinchwad : अजित गव्हाणे यांच्या शरद पवार गटात पक्ष प्रवेश, अजित पवार यांची पिंपरी चिंचवड येथील पदाधिकाऱ्यांसोबत पुण्यात बैठक

पुणे रेल्वे विभागातून लांब पल्ल्यांच्या आणि लोकल गाड्यांची संख्या मोठी आहे. पुणे विभागातून दिवसाला २११ रेल्वे गाड्या धावतात. त्यातून साधारण दीड लाखांच्या जवळ दररोज प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांकडून अडचणीच्या वेळी ‘रेल मदत अॅप’वरून तक्रार केली जाते. या तक्रारींची दखल घेण्यासाठी पुणे रेल्वे विभागाच्या नियंत्रण कक्षात २४ तास एक कर्मचारी तैनात करण्यात आला आहे.

तक्रार सोडवली जातेच

‘रेल मदत अॅप’वरून तक्रार आल्यावर तत्काळ त्याची दखल घेऊन संबंधित विभागाला तक्रार सोडवायला सांगितले जाते. त्यानुसार संबंधित विभागाकडून तक्रारदाराला पाच ते सात मिनिटांत फोन करून त्याची तक्रार जाणून घेऊन ती सोडविण्यास प्राधान्य दिले जाते. दिवसभरात आलेल्या कोणत्या तक्रारी होत्या, त्याच्यावर काय कार्यवाही केली, याची दररोज आढावा बैठक घेतली जाते. तक्रार केल्यानंतर तिची दखल घेऊन सोडविण्याचे प्रमाण १०० टक्के असल्यामुळे प्रवाशांना ‘रेल मदत अॅप’वरील विश्वास वाढल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अॅपवर अशी करा तक्रार

प्ले स्टोअरवर जाऊन ‘रेल मदत’ नावाचे अॅप डाउनलोड करावे. रेल्वे संदर्भात तक्रार करण्यासाठी तुम्हाला रेल्वे क्रमांक अथवा तिकीट क्रमांक (पीएनआर) तेथे टाकावा. त्यानंतर तक्रार नोंदवावी. ज्या विभागाबाबत तक्रार असेल, त्यांच्याकडून काही मिनिटांत फोन येऊन तक्रार सोडविण्यास प्राधान्य दिले जाते.

पुणे रेल्वे विभागात ‘रेल मदत’वर येणाऱ्या तक्रारी

८० ते १००
दिवसाला येणाऱ्या साधारण तक्रारी

९,०७८
गेल्या दोन महिन्यांत आलेल्या तक्रारी

२८,८००
२०२३-२४मध्ये आलेल्या एकूण तक्रारी

‘रेल मदत अॅप’वर तक्रार आल्यानंतर काही मिनिटांत प्रवाशांची तक्रार सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाते. तक्रारींसाठी नियंत्रण कक्षात ‘२४ बाय ७’ एक व्यक्ती उपस्थित असते. या तक्रारीवर काय कारवाई केली, याचा दररोज आढावा घेतला जातो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply