Indian Railway: भगव्या रंगाच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनची झलक; 25 नव्या फिचर्ससह

नवी दिल्ली- भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत आता लवकरच आपल्या नव्या रुपात समोर येत आहे. आतापर्यंत देशात चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा रंग पांढरा किंवा निळा होता. पण, आता यामध्ये आणखी एका रंगाचा समावेश होणार असून येत्या काळात भगव्या रंगाच्या ट्रेन आपल्याला दिसू लागतील. चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीकडून बनवण्यात आलेली नवी ट्रेन ८ डब्यांची असून भगव्या आणि राखाडी रंगाची आहे.

वंदे भारत ट्रेनवर लावण्यात आलेल्या चित्त्याच्या लोगोमध्येही बदल करण्यात आला आहे. यासह फिचर्समध्ये जवळपास २५ बदल करण्यात आले आहेत. भगव्या रंगाच्या वंदे भारत ट्रेनचा ट्रायल घेण्यात आला असून लवकरच ट्रेन लोकांच्या सेवेत येणार आहे. रेल्वेमंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली असून याचे फोटो शेअर केले आहेत. भविष्यात याच रंगातील वंदे भारत ट्रेनचे निर्माण होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis Japan Visit: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपान दौर्‍यावर रवाना

नवे फिचर्ज

वंदे भारत ट्रेनच्या फिचर्समध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सीट अधिक आरामदायक करण्यात आली आहे. वॉशबेसिनची खोली वाढवण्यात आली आहे. सीटचा अँगल बदलण्यात आला आहे. चार्जिंग पॉईंटची जागा बदलण्यात आली आहे. सीटचा रंग बदलण्यात आलाय. व्हीलचेअरसाठी वेगळा पॉईंट देण्यात आला आहे. टॉयलेटमधील लाईटची तीव्रता वाढवण्यात आली आहे.

पडदे मजबूत आणि कमी पारदर्शन करण्यात आलेत. सीटच्या मागे मॅगझिन बॅग देण्यात आलेत. टॉयलेट हँडल फ्लेक्झिबल करण्यात आलाय. आपात्कालीन परिस्थितीसाठी असलेल्या हातोडा कवर आणखी चांगला करण्यात आलाय. एअरोसोल फायट डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टिम लावण्यात आले आहे. असे अनेक बदल करण्यात आले आहेत.

चांगली एसी हवा मिळावी यासाठी व्यवस्था करण्यात आली हे. एफआरपी पॅनलमध्ये सुधारित पॅनल लावण्यात आले आहे. उंच पेंटोग्राफ लावण्यात आले आहे. आपात्कालीन स्टॉप पुश बटन बदलण्यात आला आहे. अग्निशमन युनिटसाठी पारदर्शक दरावाजा लावण्यात आलाय. एकूण २५ बदल करण्यात आल्याची माहिती आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply