T20 World Cup 2024 दरम्यान टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर शस्त्रक्रिया, इतके महिने क्रिकेटपासून दूर

Indian Cricket Team: टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित करण्यात येणाऱ्या टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये खेळत आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या एका स्टार ऑलराऊंडरशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर या स्टार खेळाडूवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. यामुळे हा खेळाडू आता पुढील काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून शार्दुल ठाकूर आहे.

अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो किमान तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. सोशल माध्यमावर स्वतः शार्दुल याने पायाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली.

IND Vs USA सामना पावसामुळे रद्द झाला तर... पाकिस्तानचे देव पाण्यात, जाणून घ्या समीकरण

शार्दुल ठाकूर याला याआधी २०११मध्येही पायाच्याच दुखापतीचा सामना करावा लागला होता. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला दुखापत झाली होती; पण तरीही तो मुंबईसाठी रणजी स्पर्धेत खेळला.
मुंबईने ४२व्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. आयपीएलच्या नुकत्याच पार पडलेल्या मोसमातही त्याला चमक दाखवता आली नाही. आता भारतातील स्थानिक मोसम सुरू होण्याआधी तो तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply