Ind vs Aus, Final Toss : फायनलचा महामुकाबला सुरू! ऑस्ट्रेलिया ठरली 'टॉस'चा बॉस; बॅटिंग टीम इंडियाचीच

Ind vs Aus, Final Toss :  ज्या क्षणाची गेले काही महिने आतुरतेने वाट पाहिली गेली होती. तो क्षण अखेर आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याला प्रारंभ झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना २ वाजता सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी टॉस करण्यात आला. हा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येणार आहे.

World Cup Final 2023 : टीम इंडिया, विजयी भव! ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वविजयी होण्यासाठी 'रोहित सेना' सज्ज

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांचा रेकॉर्ड..

या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर,या संघाने १९ सामने खेळले आहेत.यापैकी भारतीय संघाला ११ सामने जिंकता आले आहेत. तर ८ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर भारतीय संघाची विजयाची सरासरी ५७.८९ इतकी राहिला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर ६ सामने खेळले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाला ४ सामने जिंकता आले आहेत. तर २ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ६६.६६ टक्के इतकी राहिली आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

वर्ल्डकपचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.या मैदानाव भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाला १ सामना जिंकता आला आहे. तर भारतीय संघाने २ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply